माणुसकीची भिंत ची गरजू निराधार वंचिता सोबत दिवाळी साजरी…

माणुसकीची भिंत ची गरजू निराधार वंचिता सोबत दिवाळी साजरी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो हि भावना विसरून तो स्वार्थी व आत्मकेंद्रीत झाला आहे तो भौतिक सुखात समाधान शोधतो परंतु तेही मिळत नाही आपल्या महापुरुषानी व संतांनी रंजल्या-गांजल्या आर्थिक दुर्बल अनाथ वंचितांना मायेचा आधार देऊन त्यांच्या निष्काम सेवेतच सुखाची प्राप्ती सांगितली आहे. माणुसकीची भिंतीचे सदस्य ही सामाजिक भावना जपून मागील चार वर्षापासून गोरगरीब गरजू अनाथ लोकांसाठी मदतीचे कार्य करत आहे. माणुसकीची भिंत पुसद येथे गोरगरिबांना दररोज कपडे व अन्नदान करून व इतर उपयोगी वस्तू देऊन सदस्य मदत करत असतात. उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील मदत केंद्रावर रुग्णांना व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना व पुसद येथील गरजूंना दररोज अन्नदान करत आहे निराधार लोकांसोबत सण साजरे करत असतात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिवाळी हा सन सोशल डिस्टन्स चे पालन करून मोठ्या आनंदाने गोरगरीब व निराधार लोकांसोबत माणुसकीची भिंत शनी मंदिर येथे साजरा करण्यात आला. निराधार पुरुषांची दाढी व कटिंग करण्यात आली त्यांना नवीन कपडे देऊन दिवाळीच्या भेटवस्तू देऊन त्यांना भाजी पोळी वरण भात व जिलेबी चे जेवण देण्यात आले महिलांना नवीन साड्या मुलांना व मुलींना कपडे देण्यात आले त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवाळीचा सण साजरा करण्यात आला निराधारांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता समाधान देऊन जाते.अन्नदानाचा खर्च दीपावली निमित्त रामबहादुर कीर्तीसिंह रावल पुणे यांनी दिला
यावेळीस प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर टेटर सुशांत महल्ले पंकज पाल महाराज मधुकर चव्हाण यशवंत देशमुख गोपाल सुरोशे दत्तात्रय जाधव सचिनभाऊ भिताडे बंडूभाऊ भुसाळे अभिमन्यू चोपडे सुनील टाक बंटी टाक अशोकराव गायकवाड संतोष गायकवाड स्वातीताई वाट
उपस्थित होते.
माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सर्व पुसद वासियांना दिवाळी व इतर कुठलाही सण गरजूंना भेटवस्तू व जेवण देऊन साजरा करण्याचे आव्हान केले .
यावेळेस माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव सचिव जगत रावल प्रसिद्धीप्रमुख संतोष गावंडे उपाध्यक्ष मधुकर वाळूकर आदित्य जाधव दीपक घाडगे व माणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्या मोनिका जाधव मोना जगत रावल निर्मला प्रकाश रावत शीला वानखडे शकीला बाई व इतर मान्यवर उपस्थित होते

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….