देश की बेटी मनिषा वाल्मिकी सहीत देशातील इतर पिडीत मुलींच्या गुन्हेगारांना फाशी द्या -बहुजन क्रांती मोर्चाची मागणी
बहुजन क्रांती मोर्चाने केले धरने आंदोलन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथे बहुजन क्रांती मोर्चा पुसदद्वारे उत्तर प्रदेशातील हाथरस येथील देश की बेटी कु. मनीषा वाल्मिकी हिचा बलात्कार व खून करण्यात आला त्याच्या विरोधात व उत्तर प्रदेशातील मनुवादी शासन-प्रशासन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच्या विरोधात पहिल्या टप्प्यातील धरणे आंदोलन (ता.8 आक्टोबर) करण्यात आले. यावेळी पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस, दारव्हा आदी तालुक्यातील जवळपास 31 सामाजिक संघटनांनी जाहीर समर्थन व सहभाग घेतला.
सध्या देशभरात गाजत असलेले हाथरस येथील मनीषा वाल्मिकी बलात्कार व खून प्रकरण तसेच बलरामपुर, आजमगड, अलिगड, खरगोन, तरोडा व देशभरात अनुसूचित जातीतील मुलींवर बलात्कार होताहेत. त्याच्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक
मा. वामन मेश्राम साहेबांनी चार टप्प्यात राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात केली होती. त्यानुसार देशातील 550 जिल्ह्यात एकाच दिवशी पहिल्या टप्प्यातील धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पुसद मध्येही भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यापुढे सुद्धा 15 ऑक्टोबर रोजी रॅली प्रदर्शन, 22 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश बंद, व 30 ऑक्टोबर रोजी देशव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. या सर्व आंदोलनात बहुजन समाजातील प्रत्येक संवेदनशील स्त्री- पुरुष विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाने केले आहे. या वेळी गणपत गव्हाळे (संयोजक बहुजन क्रांती मोर्चा) किशोरभाऊ नगारे (जिल्हाध्यक्ष,भारत मुक्ती मोर्चा) अर्चना खंदारे (संयोजिका, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ) वर्षाताई देवसरकर(बहुजन मुक्ती पार्टी) तहसिन भाई (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा) सुधीरभाऊ देशमुख (संभाजी ब्रिगेड) किशोर नगारे,सुभाष धुळधुळे (भारत मुक्ती मोर्चा) लक्ष्मण कांबळे (बहुजन क्रांती मोर्चा) विद्वान केवटे (कार्याध्यक्ष,भारतीय युवा मोर्चा) हाफिज खलील सिराज , राजेश ढोले(अन्याय अत्याचार निवारण) पुंजाराम हटकरे (राष्ट्रीय किसान मोर्चा), पुंडलिक तलवारे (लहुजी क्रांती मोर्चा) देवाभाऊ जगताप,डंगारेभाऊ (बिरसा क्रांती दल) वाय.एम.जांभूळकर (समता सैनिक दल) ज्ञानेश्वर तडसे (माजी पं.स.स.) डाॅ.नदीम साहेब,नईम सर(जमात ए इस्लामी हिंद) अशोक बाबा उंटवाल (माजी नगरसेवक) नितीन सोनवाल(वाल्मिकी समाज) संजय हनवते (लहुजी शक्ती सेना) रामदास कांबळे (परिवर्तन टाईम्स) विनोद उबाळे (भा.यु.मो.) यांनी आपले विचार व्यक्त केले.
धरणे प्रदर्शनानंतर शेवटी मा.तहसीलदार पुसद मार्फत मा. महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
या वेळी बहुजन क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,
राष्ट्रीय गोर-बंजारा क्रांती संघ ,
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा , भारतीय विद्यार्थी , युवा , बेरोजगार मोर्चा , मौर्य क्रांती संघ , लहुजी क्रांती मोर्चा , राष्ट्रीय किसान मोर्चा , अन्याय अत्याचार निर्मूलन समिती , भीम पॅंथर सामाजिक संघटना ,
अखिल भारतीय नौजवान सभा ,
बिरसा क्रांती दल , अखिल भारतीय बंजारा युवा सेना , समता सैनिक दल , सावित्री महिला मंच , वासुदेव समाज संघटना , मराठा युवा मंच , छत्रपती क्रांती सेना , जोशी समाज संघटना , भारतीय बौद्ध महासभा , लहुजी शक्ती सेना, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती , संभाजी ब्रिगेड , जमात-ए-इस्लामी हिंद , जमियत उलेमा हिंद , घिसडी समाज संघटन , नवल बाबा मित्र मंडळ , गोपाळ समाज संघटना आदी 32 संघटना सहभागी झाल्या होत्या.