वन अधिकाऱ्याकडून कोरोना विषाणू नियमाचे उल्लंघन
नियम धाब्यावर बसून भरली सभा,
दराटी पोलीस ठाणेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
स्वप्निल चिकाटे
मो-9970535988
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ढानकी
ढाणकी प्रतिनिधी उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यातील कोरटा वनपरिक्षेत्र अधिकारी वनजीव अंतर्गत चिखली चेक पोस्ट गुलमोहर शासकीय विश्राम गृहाच्या पटांगणामध्ये विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणे वनजीव पांढरकवडा यांनी कोरोना विषयाचे उल्लंघन करून यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धाब्यावर बसून पैनगंगा संघर्ष समितीच्या नावाने अंदाजे १०० ते १५० लोकांना जमवून सभा भरवण्यात आली
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्हा हतबल झाला असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागांमध्ये वाढू लागला आहे ढाणकी सारख्या ठिकाणी कोरोणाचा रुग्ण आढळला आहे ढाणकी शहरांमध्ये कडे कोड जनता कर्फ्यू असताना ढाणकी शहरांमधून काही कर्मचारी कोरटा वनपरिक्षेत्र वन्यजीव विभागाच्या आयोजित गुलमोहर शासकीय विश्रामगृह चिखली मध्ये कर्मचारी व काही नागरिक आले होते त्यात वन विभागाने कोणत्याही प्रकारची संबंधित विभागाची परवानगी न घेता एकाच वेळी अंदाजे १०० ते १५० लोकांना एकाच ठिकाणी जमून पैनगंगा संघर्ष समिती च्या नावावर मीटिंग बोलून सामाजिक अंतर व तोंडाला मासन न लावणे कोरोना विषयक नियमाचे उल्लंघन केले याठिकाणी बिटरगाव जेवली,सोंदाबी मोरचंडी पिंपळगाव सहस्त्रकुंड टेंभूरदरा कुरळी भवानी कोरटा थेरडी व गाडीवन या गावचे नागरिक उपस्थित होते व वनपरिक्षेत्र अधिकारी बिटरगाव ,उमरखेड ,कोरटा,सोंदाबी व खरबी या गावांचे सर्व वनजीव वनपरिक्षेत्र अधिकारी व वन वर्तुळ अधिकारी उपस्थित होते
यवतमाळ जिल्ह्यामध्ये संचार बंदीचा कायदा लागू असतानी विभागीय अधिकाऱ्याच्या सभेमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या तोंडाला मास सुद्धा नव्हते उपस्थित नागरिक कोण कोणत्या गावाहून आलेले आहेत याबाबत नोंदणी सुद्धा करण्यात आली नाही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषयक नियम मोडण्याचा व जमाव बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना जमा करण्याचा अधिकार कोणी दिला हे एक कोडेच आहे चिखली परिसरात कोणाचा शिडकाव झाल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे ग्रामपंचायत चिखली सरपंच यांनी याविषयी बोलण्यास टाळले आहे जमावबंदीचा कायदा हा नागरिकांना वेगळा आणि कर्मचाऱ्यांना वेगळा आहे का असा प्रश्न परिसरातील नागरिक मनात तयार होत आहे
दराटी पोलीस स्टेशन ठाणेदार पाडव साहेब यांना यासंदर्भात कल्पना असून त्यांनी कोणत्याच प्रकारे कारवाई केली नसल्याने ठाणेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पुसद उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या नावाने पुसद आणि उमरखेड उपविभाग हादरून गेला आहे उपविभागीय पोलिस अधिकारी संबंधित वन अधिकाऱ्यावर जमाव बंदी विषयक कोणती कारवाई करतात याकडे परिसरातील जनतेचे लक्ष वेधले आहे
👆बिटरगाव वन्यजीव वन वर्तुळ अधिकारी ए व्ही गिरी साहेब कोरोना विषयक नियम मोडताना तोंडाला मास्क नाही