पुसद तालुक्यात दिनांक 15ते21 जुलै कंप्लेट शेट डाऊन कोरोनाचे रुग्ण वाढल्याने घेतला निर्णय
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
पुसद शहर व परिसरात कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल डिस्टन्स चे पालन व्हावे,अनावश्यक प्रवास टाळावा, बाजारात अनावश्यक गर्दी करू नये,मास्क आणि सॅनिटाइझर चा वापर करावा,आपल्या घराच्या आजूबाजूला जमाव करून बसू नये या व इतर सूचना प्रशासनाद्वारे वारंवार केल्या जात आहेत.वेळप्रसंगी दंडात्मक कार्यवाही सुद्धा करण्यात येत आहे.तरीसुद्धा सामान्य जनतेला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आलेले आहे.परिणामी कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.
सध्या उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आणि लोकप्रतिनिधी,व्यापारी असोसिएशन ,विविध संघटना यांच्याशी चर्चा करून प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांच्या मार्गदर्शनात पुसद प्रशासनाने दि.15/7/2020 ते दि 21/7/2020 या 7 दिवसाच्या कालावधीत पुसद शहर व आजूबाजूचा परिसर ,शेम्बाळ पिंपरी,जांबबाजार,बेलोरा येथील बाजारपेठ संपूर्ण बंद (कॉम्प्लेट शट डाऊन) करण्याचे ठरवण्यात आलेले आहे.या बंद च्या कालावधीत कुणीही आपल्या घराच्या बाहेर पडू नये किंवा आपल्या गल्ली मोहल्यात ग्रुप करून एकत्रित जमा होऊ नये. पुसद नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी कोरोना योध्याची जवाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते आपापल्या प्रभागात वरील सूचनांचे पालन करण्यासाठी प्रशासनास मदत करतील.
प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे की नियम पाळून सहकार्य करावे। जे लोक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर आवश्यक दंडात्मक आणि फौजदारी कार्यवाही करण्यात येईल
उपविभागीय अधिकारी
पुसद