भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्री जवळ हल्ला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 22 एप्रिल :- खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्या मातोश्रीवर हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर मातोश्रीजवळ शिवसेना कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत, जर नवनीत राणा यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं तर त्यांना शिवसेनेकडून महाप्रसाद देण्यात येणार असल्याचा शिवसेना नेत्यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान आज भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मातोश्रीजवळी कलानगर सिग्नलजवळ हा हल्ला करण्यात आला होता.
मोहित कंबोज ‘मातोश्री’ जवळ रेकी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. या रागातून शिवसेना कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..