अमोल मिटकरींच्या “त्या” वक्तव्यावर अजित पवार भडकले , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :– विदर्भातील राष्ट्रवादीचे आमदार गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळाव्यात ब्राम्हणांची नक्कल केली त्यावरून राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे.
अखिल ब्राह्मण महासंघाकडून मिटकरी यांच्या निषेदार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. राजकीय व्यक्तींनी तारमत्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहीजेत असे पवार म्हणाले ते पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
अजित पवार म्हणाले, ‘माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजेत.
दरम्यान, आमदार मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळव्यात ब्राम्हणांची नक्कल करत काही मंत्रही म्हटले होते. मिटकरी यांच्याकडून ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत त्यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….