उद्धव ठाकरेंची हात जोडून विनंती ; शिवसैनिक म्हणाले , आम्ही इथेच…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या सरकारी निवासस्थानाकडे निघाले असून, यावेळी त्यांनी मातोश्री (Matoshree) बाहेर जमा झालेल्या हजारो शिवसैनिकांना हात जोडून घरी जाण्याची विनंती केली आहे.
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांनी उद्या सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, मोतोश्रीवर येण्याची कुणाचीही हिंमत नाही असेदेखील उद्धव ठाकरे म्हटले असून, शिवसैनिकांना आवाहन करताना उद्धव ठाकरेंनी आक्रमक बाणा घेतल्याचे पाहिले जात आहे.
दरम्यान, मातोश्री समोर हजारो शिवसैनिक (Shivsena) जमा झाले असून, त्यांनी राणा दाम्पत्याला येथे पाऊल ठेवू देणार नसल्याचा तसेच रात्रभर येथेच पहारा देण्याचा निर्धार केला आहे. तसेच आपण येथून कुठेही जाणार नसून, राणा दाम्पत्याला चांगलाच धडा शिकवणार असल्याचे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. परंतु, यावेळी तुम्ही सर्वजण सकाळपासून येथे जमला आहात. तुम्ही घरी जा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात जोडून उपस्थित हजारो शिवसैनिकांना केली.
‘कोणामध्ये किती दम आहे?’ नवनीत राणांचं शिवसैनिकांना आव्हान
तुम्ही राज्याचे प्रथम नागरिक आहात. हनुमान जयंती होती त्यावेळी तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन महाराष्ट्रातील संकट घालविण्यासाठी प्रार्थना केली नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कधी भाष्य करत नाही. मुख्यमंत्री दोन वर्षानंतर मंत्रालयात जातात, तर महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला? याचा विचार करा. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकत मोठे झाले आहोत. आज बाळासाहेबांची तिसरी पिढी राजकारणात आहे. मी मुंबईची मुलगी असून विदर्भाची सून आहे. सर्व ताकद माझ्यासोबत आहे. कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही, असा इशारा खासदार नवनीत राणांनी शिवसैनिकांनी दिला आहे.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक करत आहेत. त्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे. आम्ही मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसेचं पठण करणार. आता शिवसैनिक की हनुमान चालिसेत दम आहे हे उद्या दिसणार आहे. माझ्या धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही. शिवसेनेला हरवूनच मी खासदार झाले आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या. संजय राऊत पोपट आहेत. दररोज सकाळी माध्यमांसमोर येऊन बोलतात. आम्हाला हनुमान चालिसेचं पठण करण्यापासून उद्धव ठाकरे देखील रोखू शकत नाहीत.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..