वैष्णोदेवी मंदिर परिसरात प्रचंड गर्दी उसळली चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जम्मू काश्मीर :- माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घडली आहे.नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली असतांना रात्री उशीरा झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे.
दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो भाविक वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी येत असतात.दरम्यान यावर्षी कोरोनाचा प्रकोप असतांनाही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते.दरम्यान रात्री दोन वाजता काही भाविकांमध्ये वाद झाला.या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामुळे हजारो भाविकांची पळापळ सुरू झाली.

या पळापळीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर २० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.त्या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. चेंगराचेंगरीनंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले. तर आता मंदिर परिसरातून भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….