पंतप्रधान नरेंद्र मोदीची अन्नदात्याला नववर्षाची भेंट ; शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार २० हजार कोटी रुपये….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकºयांना भेट दिली आहे.
एक जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता शेतकऱ्यांच्या नावाने २० हजार कोटी रुपये भरले जाणार आहे.
पंतप्रधानांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी नव्या वषार्तील पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला समर्पित करणार असल्याचे सांगितले. यानुसार १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.
मोदी म्हणाले, नववर्ष २०२२ चा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना समर्पित असेन. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसान योजनेचा १० वा हप्ता जारी करण्याची संधी मिळणार आहे.
या अंतर्गत २० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून १० कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा होईल.देशातील छोट्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून दर वर्षी सहा हजार रुपये दिले जातात.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….