नगरपंचायत निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मुदतवाढ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 06 डिसेंबर :- राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे आदेशान्वये यवतमाळ जिल्ह्यातील नगर पंचायत महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव व झरी जामणी च्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा तसेच नगर पंचायत ढाणकी च्या रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या निवडणुकीत उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे दाखल करणे शक्य व्हावे या हेतूने नामनिर्देशनपत्राचा कालावधी दि. 07 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे.
तसेच उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा तसेच विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यास दि. 08 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.
000