१२ निलंबित खासदाराच्या भेटीला शरद पवार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- १२ खासदारांच्या निलंबनामुळे संसदेच्या हिवाळी आधिवेशनात पहील्या दिवसापासून सुरु असलेल्या संघर्षाची समाप्तीकडे वाटचाल सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खा.जयाप्रदा यांनी गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणाऱ्या खासदारांना भेटून पाठींबा जारी केला आहे. दरम्यान तेलंगना राष्ट्र समितीच्या खासदारांनी आज हिवाळी आधिवेशनाच्या उर्वरीत कालावधीवर बहीष्कार टाकत निलंबीत खासदारांना पाठींबा जाहीर केला आहे.
खा. शरद पवार यांनी आज गांधी पुतळ्याजवळ निलंबित खासदारांची भेट घेतली. त्यावेळी खासदारांनी गाणी गात आंदोलन केले. त्याला पवारांनी साथ दिल्याचे त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमधे दिसत आहे.
पावसाळी आधिवेशनात शेवटच्या दिवशी विमा विधेयक मंजूर होत असताना झालेल्या गोंधळा दरम्यान १२ खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय हिवाळी आधिवेशनाच्या पहील्या दिवशी जाहीर करण्यात आला. यावरुन दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक आहेत. संसंदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांनी माफी मागितली तर निलंबन मागे घेता येईल असे पुन्हा सांगितले आहे. सर्व निलंबीत खासदारांना माफी मागणार नाही अशी भुमिका घेतली आहे.