धारदार तलवारीने तरुणाला भोकसले ; तरुणाचा मृत्यू ; काळी दौ.मध्ये तणावपूर्ण शांतता ; पोलिसांचा कडक बंदोबस्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाने तलवारीने भोकसून एकाचा खून केल्याची घटना
काळी दौ.येथे आज दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली आहे.शाम राठोड(२४) असे मृतक तरुणाचे नाव असून एक गंभीर जखमी असल्याचे समजते.गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त असून सध्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ,
दुचाकीने कट मारल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एका तरुणाने तलवारीने शाम राठोड नामक इसमाच्या पोटात तलवार भोकसले.त्यात शाम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यास पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्यामुळे काळी दौ.येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देवून मारेकऱ्यांच्या अटकेसाठी पथक रवाना केले.सध्या स्थितीत नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी लक्ष ठेवून आहेतं.शांतता राखण्याचे आवाहन व नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे करण्यात आले आहे.


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..