आगामी निवडणुका साठी मनसे सज्ज ; राज ठाकरे यांच्या दहा दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.
आली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या आखणीसाठीच आजची बैठक बोलवण्यात आली होती, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना सांगितलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक पार पडली.
राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज (शुक्रवारी) मुंबईत पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दुपारी दोन वाजता ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भातील पक्षाच्या भूमिकेबाबत या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करताना जेवढ्या कार्यकर्त्यांची परवानगी मिळेल, तेवढ्याच संख्येनं कार्यकर्ते आणि नेते या बैठकीला उपस्थित राहतील. ही बैठक सकाळी 10 वाजता होईल. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. तसेच माध्यमांशीही संवाद साधतील. 16 डिसेंबर रोजी राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी पुण्यात जातील. त्यानंतर कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही राज ठाकरे जातील, अशी माहितीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..