चिंचोली येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ईश्वर फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४
दिग्रस :
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून चिंचोली क्र.२ता. दिग्रस येथील ४० दिव्यंगाना कडाक्याच्या थंडीपासून मायेची उब मिळावी या उदात्त हेतूने त्यांना स्वेटर वाटप करुण यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. व तसेच कु. दूर्गा सिताराम पारधी या दिव्यांग विद्यार्थीनीची मायेणे व आस्थेने विचारपूस करूण तिचे अर्धवट राहीलेले शिक्षण संस्थेअंतर्गत शाळेत पूर्ण करूण आत्मनिर्भर होण्याकरिता योग्य ती मदत करण्याचा मानस ईश्वर फांऊडेशनच्या संयोजीका वैशालीताई देशमुख यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुनम कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रफुल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी ईश्वर फांऊडेशन चे सदस्य व संजय देशमुख मित्र मंडळ व चिंचोली येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.