तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यावर राष्ट्रपतीनी केले शिक्कामोर्तब…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. 29 नोव्हेंबर रोजी दोन्ही सदनांमध्ये हे विधेयक बिनविरोध मंजूर करण्यात आले होते.
आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे कायदे रद्द झाले आहेत. कृषीय कायदे रद्द झाल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत ‘एमएसपी’संदर्भात कायदा होत नाही, तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे शेतकरी संघटनाच म्हणणं आहे.
याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. या घोषणेवेळी ते म्हणाले होते की, एमएसपीसाठी समिती गठीत करण्यात येईल. हे कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेचे शेतकऱ्यांनी स्वागत केलं होत, मात्र आंदोलन मागे घेतलं नव्हतं.
याबद्दलच बोलताना आज शेतकरी नेते हन्नान मोल्ला म्हणाले आहेत की, या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या 687 शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी. आंदोलनावेळी शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. यासोबतच एमएसपीचा कायदा करणार, असे लिहिखित आश्वासन दिल्यास आंदोलन मागे घेण्यात येईल, असे ते म्हणाले आहेत