महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी व ढाणकी नगर पंचायतमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 29 नोव्हेंबर :- यवतमाळ जिल्ह्यातील नगर पंचायत महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव व झरी जामणी च्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा तसेच नगर पंचायत ढाणकी च्या रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला आहे.
निवडणुकीकरीता दिनांक 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2021 पावेतो नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे असून नामनिर्देशन पत्राची छाननी 8 डिसेंबरपासून होणार आहे. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक 13 डिसेंबर आहे. निवडणूक मतदान 21 डिसेंबर रोजी व मतमोजणी 22 डिसेंबर 2021रोजी घेण्यात येईल.
उक्त नगर पंचायत निवडणूक करिता निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….