तेव्हा मी स्वत : राज ठाकरेंना फोन केला ; भाजपा-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात शिवसेना – भाजपा यांच्यात मुख्यमंत्रिपदा वरुन बिनसल्यानंतर शिवसेनेने २५ वर्षाची युती तोडत काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला . २०१ ९ च्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली.
सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं . शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी असं सरकार स्थापन झाल्यामुळे भाजपा एकाकी पडली . त्यामुळे भाजपाला मनसेसारख्या नव्या मित्राची गरज भासेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी मोदी – शाह जोडीवर शरसंधान साधलं होतं . परंतु राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो हे महाविकास आघाडीनं दाखवून दिलं . त्यामुळे भविष्यात भाजपा – मनसे युती होईल असं अनेकदा बोललं जातं . अलीकडेच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी सदिच्छा भेट दिली . या भेटीनंतर भाजपा-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आलं . आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजपा – मनसे जवळीक होईल असं राजकीय विश्लेषक सांगत आहे . परंतु अद्यापही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावर अधिकृत भूमिका मांडली नाही . राज ठाकरेंच्या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की , मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तरी मी जाईल . राज ठाकरे प्रभावी नेते आहे . त्यांनी नवीन घरं बांधलं तेव्हा मी स्वत : त्यांना अभिनंदनांचा फोन केला . तेव्हा राज ठाकरेंनी कोविड काळामुळे कार्यक्रम घेता आला नाही . मात्र अनेक मित्रांना मी घरी बोलावलं . तुम्ही आणि वहिनी जेवायला या असं निमंत्रण त्यांनी दिलं . तेव्हा आम्ही जेवायला गेलो . राज ठाकरेंकडे खूप माहिती असते . राज ठाकरेंना प्रत्येक विषयाचं ज्ञान चांगले आहे . वेगवेगळ्या विषयावर आम्ही गप्पा मानल्या . आम्ही युती करण्यासाठी गेलो नव्हतो . भाजपा – मनसे युतीबाबत काहीही चर्चा नाही . सध्यातरी भाजपा स्वबळावर जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे असं त्यांनी स्पष्ट केले आहे . पर्यायी सरकार देऊ सत्ता परिवर्तनसाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही . अंतर्विरोधामुळे हे महाविकास आघाडी सरकार पडेल . सरकार कोसळेल वाटतं तेव्हा ते मजबूत होतं . भ्रष्टाचार या एका मुद्यावर महाविकास आघाडी सरकारला मजबूत ठेवलं आहे . सगळे मिळून महाराष्ट्राला कशाप्रकारे लुटता येईल हे पाहत आहे . परंतु एकवेळ असहनीय होईल . ज्यादिवशी सरकार कोसळेल तेव्हा पर्यायी सरकार भाजपा देईल . परंतु आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही . कोरोना काळात भाजपानं खूप चांगले काम केले . लोकांमध्ये जात आम्ही केले आहे . २०२४ पर्यंत भाजपा जनतेच्या मनात इतकी जागा करेल की तेव्हाच्या निवडणुकीत भाजपा एकटं सरकार स्थापन करेल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला .