महाविश्वासघाती आघाडी प्रकाश जावडेकर यांची राज्य सरकारवर टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- उद्धव ठाकरे सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली . इतके भ्रष्ट , बेकार आणि संधीसाधू सरकार महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले नाही , अशी टीका माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे . ते आज रविवारी (ता .२८) पत्रकाराशी बोलत होते . जावडेकर पुढे म्हणतात , या सरकारला महाविकास आघाडी म्हटले जाते . मात्र दोन वर्षांतील त्यांचे कर्तृत्व पाहिल्यानंतर लोकांनी तिला महावसूली आघाडी असे नाव ठेवले आहे . मी आज या आघाडीचे महाविश्वासघाती आघाडी असे नामकरण करतो , असा टोला प्रकाश जावडेकर यांनी ( BJP ) लगावला आहे .
महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याची खलबते आताही भाजपकडून सुरु असल्याचे दिसत आहे . सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचा फोटो भाजपकडून शेअर करण्यात आला होता . दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सरकार मार्चमध्ये पडेल असे भाकित वर्तवले होते . मात्र महाविकास आघाडीचे नेते सरकार पाच वर्षे टिकेल अशा त्या भाकिताला उत्तर देत आहेत .

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….