आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात ? नाना पटोलेंच्या निर्णयामुळे राजकीय खळबळ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे . मात्र , महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर याबाबत खुलासा होऊ शकला नव्हता . पण आता काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याच ठरवलं असल्याचं समोर आलं आहे . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरअध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना पाठवलेल्या पत्रात स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा असे निर्देश दिले आहे .
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , महानगरपालिका आणि नगरपालिकीच्या निवडणूका स्वतंत्र लढवायच्या आहेत . त्यामुळे त्या पद्धतीने तयारी सुरू करा आणि स्थानिक पातळीवर कुठलेही तडजोड करायची नसल्याचे निर्देश नाना पटोले यांनी शहरअध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना पाठवलेल्या पत्रात दिले आहेत . त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडी एकमेकांविरोधात मैदानात पाहायला मिळण्याची शक्यता आहे .

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….