माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन ; राष्ट्रीय एकात्मतेची शपथ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 19 नोव्हेंबर :- देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री, भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी ललितमुमार वऱ्हाडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वऱ्हाडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. सर्व उपस्थितांनी देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी तसेच ती अधिक दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची व आपापसातील सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद, तंटे किंवा इतर राजकीय, आर्थिक गाऱ्हाणी शांततामय व संविधानिक मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाला देवेंद्र चंपारिया, नंदु बुटे, मनिषा चव्हाण, नितीन जिचकार, अनिल मनवर, पी.एस. शिंदे, रामदास घोडके, एन.आर. शेख, रत्नाकर मुळे, संजय इंगळे, श्री. भिसे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.