महागाव तालुक्यातील इजनी बारभाई तांडा येथे वाघाचा मृत्यू , वनखाते अनभिज्ञ
यु.एन.वानखेडे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- महागाव तालुक्यातील बारभाई तांडा इजनी येथील कॅनॉलवर (वाघ) बिबट्या अंदाजे पंधरा दिवसापासून मरून पडला असून तो मृत बिबट्या गुराखी यांनी आज पाहिला आणि वन विभागाला कळवले . वनविभाग यांनी आज पंचनामा केल्याची समजते. बिबट्याचा सापळा झाला असून पंधरा दिवसापासून मृत झालेल्या बिबट्या कडे वन खात्याने अद्यापपर्यंत लक्ष दिले नाही. वनखाते ही आपली नोकरी घरी बसून करतात की वनात राहून करतात हा एक आता शोधाचा विषय आहे. महागाव तालुक्यात वाघाचे अस्तित्व धोक्यात आले असून या वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे गूढ कायम आहे. वाघाचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला किंवा वाघाला कोणी मारले हे शवविच्छेनानंतरच कळेल .हे क्षेत्र केंद्रे मॅडम यांचे आहे. वन खात्याचे कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत नसल्याने वाघाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. माणूसच काय पण वाघ आता असुरक्षित झाल्याचे दिसून येत आहे या वाघाचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध वनखात्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..