यवतमाळात परिविक्षाधीन डॉक्टर ची हत्या ; महविद्यालयात खळबळ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.त्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चेला पेव फुटले आहेत.
मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार ,मृतक हा परिक्षाविधिन डॉक्टर आहे.
याच शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. या डॉक्टरचे नाव अशोक पाल असे आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. ही हत्या अज्ञात व्यक्तीने केली असून शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरात आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान, हत्या प्रकरणानंतर रुग्णालय परिसरात परिविक्षाधीन डाॅक्टराकडून महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. रुग्णालयामध्ये परिविक्षाधीन डॉक्टरांनी ठिय्या मांडला. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्न विचारला जात आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….