झिरपूवाडी च्या बंकेश पवार ची यूपीएससी मध्ये बाजी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस (यवतमाळ) :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी प्रशासकीय सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सर्वाधिक सात नागपूरचे यवतमाळ आणि चंद्रपूर तीन तर गोंदिया चा एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दिग्रस तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले
झिरपूरवाडी या छोट्याशा गावातून बंकेश बाबाराव पवार 516 व्या रँकने यशस्वी झाला. बंकेसचे वडील बाबाराव पवार वन विभागातून निवृत्त झाले. आहेत.ते इयत्ता दहावी मध्ये मेरिटमध्ये उत्तीर्ण झाले असून पुढील शिक्षण त्यांचे व्ही आय टी कॉलेज पुणे येथे पूर्ण झाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय रामजी आडे(आजोबा) यांच्या प्रेरणेने बंकेशने यूपीएससीची तयारी केली तसेच त्यांचे वडील बाबाराव पवार आणि आई सुचीता पवार यांचे सुद्धा मार्गदर्शन मिळाले.
युपीएससी मध्ये बंकेश पवारने मिळवलेल्या यशाबद्दल झिरपुरवाडी गावात आनंद व्यक्त होत असून झिरपूरवाडीचे सरपंच पुरुषोत्तमकुडवे यांनी बंकेशचे आई-वडील यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. एका छोट्याशा गावातून बंकेश यूपीएससीमध्ये उत्तीर्ण झाला ही सर्व गावकऱ्यांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असे झिरपूरवाडीचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..