सिंचन उपविभाग पुसद यांच्या हलगर्जीपणामुळे झिरपुरवाडी पाझर तलाव फुटला; शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे 9370464824
दिग्रस :
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या झिरपुरवाडी पाझर तलाव रात्री झालेल्या मुसळधार पावसाने फुटला.आणि शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले.तसेच गावाला पाणी पुरवठ्याची विहीर गाळली व मोटर पंपसह साहित्य वाहून गेले.९ सप्टेंबर ला तलावाची भिंत सारस पक्षाने पोखरल्याने . तलाव लिकेज् झाला.त्यावेळी सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातुरमातुर काम करून लिपापोती केली. तेव्हा भिंतीचे काम मजबूत करा असे सरपंचांनी सांगितले असता जिल्हा परिषद सिंचन उप विभाग पुसद येथील शाखा अभियंता यांनी तलाव फुटणार नाही. अशी भविष्यवाणी केली होती.आणि नंतर ढुंकूनही पाहिले नाही. तलाव फुटल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास मात्र हिरावला.सोयाबीन, कापुस व तुर अशा अनेक पिकांचे नुकसान झाले. प्रभारी तहसीलदार बन यांनी प्रत्येक्षात पाहणी केली.आणि पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. तलाठी चंदेल यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल आजच सादर केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….