मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न ; निशांत बयास यांचे जन्मदिनानिमीत्त राबविला उपक्रम…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- विश्वनाथसिंह बयास नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व नगरसेवक निशांत बयास यांचे जन्मदिनानिमीत्त मोफत नेत्र तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले . सथानिक देवीवार्ड मधील लिंगायत मठ व महाकाली चौकातील शाळा क्र .१० मध्ये असे दोन ठिकाणी हे शिबीर घेण्यात आले . यात मोफत नेत्र तपासणी करण्यात आली . ज्यांना चष्मे लागले असल्याचे लक्षात आले अशांना दि .३० सप्टेंबर रोजी मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे . ज्यांचे डोळ्यांचे नंबर निघाले , अशा सगळ्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहे . विश्वनाथसिंह बयास सह.पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबीराला एकुण १२०० गरजूंनी लाभ घेतला . यात ६७० गरजूंना चष्मे वाटप होणार आहेत . प्रथमच अशा प्रकारचे शिबीर वार्ड स्तरावर घेण्यात आल्याने नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला . या शिबीराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटल्याने व बरेच गरजु या पासुन वंचीत राहिल्याने हे एक दिवसाचे शिबीर दोन दिवस म्हणजे दि .२२ व २३ असे घेण्यात आले . यामुळे बहुतांश गरजुंना याचा लाभ घेता आला . यात देवी वार्ड , गणेश वार्ड , सुभाष वार्ड , नुर कॉलनी , महाकाली चौक परिसर , हटकेश्चर वार्ड , महाविर वार्ड , हनुमान वार्ड परिसर या भागातील गरजूंनी सहभाग नोंदवला . याच बरोबर शहरातील इतर भागातील व पांढुर्णा , शेलु , काळी अशा ग्रामीण भागातील काही गरजूंनी पण या शिबीराचा लाभ घेतला . येत्या दि .३० तारखेला लिंगायत मठ , देवी वार्ड व महाकाली चौक शाळा क्र .१० मध्ये ज्यांचे नंबर निघाले . त्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहे . निशांत बयास यांचे प्रयत्नाने यापूर्वी कोरोना काळात या भागातील तिनशे अतीगरजूंना धान्यकिट वाटप करण्यात आली होती . तर या प्रभागातील बहुसंख्य नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून घरोघर जावून त्यांची कागदपत्रे घेवून या योजनेमध्ये गरजुंचे नाव समाविष्ट करण्यात आले . नुकतेच या प्रभागात १०० वृक्ष लागवड करण्यात आली . तसेच या वृक्षांना संरक्षण कठडेपण बसवण्यात आले . येत्या काळात या प्रभागात निशांत बयास यांचे प्रयत्नाने २९ हायमास्ट लाईट आमदार फंडातून लावण्यात येणार आहे .
यापूर्वी महाकाली चौकातील शाळा क्र .१० मधील विद्यार्थ्यांना टिफीन , बॅग व वह्या – पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे . अशाप्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून निशांत बयास या भागातील नागरिकांना चांगले सहकार्य करत असल्याचे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे…