धारदार शस्त्राच्या धाकावर दुकान फोडिचा प्रयत्न फसला ; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ! महागाव तालुक्यातील मुडाणा येथिल घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रीयाज पारेख :७२५९४४४८८८
महागाव :
कॉम्प्लेक्स च्या गॅलरीत झोपलेल्या इसमाला
धारदार शस्त्राचा धाक दाखवून दुकान फोडीचा प्रयत्न फसल्याची घटना महागाव तालुक्यातील मुडाणा येथे आज (ता.२३) रात्री पावणेतीनच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार ,
मुडाणा येथे गौळ रोडवर असलेल्या पांडे कॉम्प्लेक्स मध्ये व्दारका किराणा , खुशी बुट हाऊस , भावेश कलेक्शन ही दुकाने आहेत.मध्यरात्री नेहमी प्रमाणे कॉम्प्लेक्स गॅलरीत झोपलेल्या अरविंद भिमटे या इसमाला शटर चा आवाज आल्याने तो खडबडून जागी झाला.त्याने अंगावरील ब्लँकेट काढून पाहिले असता त्याला अज्ञात चोरटे हातात धारदार शस्त्र ठेवून दुकान फोडत असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे अरविंदने तिथून पळ काढला. त्यातील तिघांनी धारदार शस्त्र घेवून पाठलाग केला.मात्र तो पर्यंत तो अरविंद भिमटे याने गावातील काही नागरिकांना घटनेची माहिती दिल्याने आरडाओरड झाली.तोपर्यंत चोरटे तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले.अज्ञात चोरट्याची संख्या चार असल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र वृत्तलेहीपर्यंत घटनेची फिर्याद महागाव पोलीस स्टेशनला देण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..