हदगाव तालुक्यातील “हस्तरा” गावचे सुपुत्र विवेक चौधरी नवे एअर चीफ मार्शल ; गावात आनंदी आनंद
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हदगाव (नांदेड) :
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील अत्यंत दुर्लक्षित असलेले कयाधू नदीकाठावरील हस्तरा हे गाव दोन दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आले या गावातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या विवेक चौधरी यांची वायुसेना प्रमुखपदी नियुक्ती झाल्याची बातमी कळताच हस्तरा येथील ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
विवेक चाैधरी हे देशाचे वायुसेना प्रमुख म्हणून १ ऑक्टाेबरपासून सूत्रे स्वीकारणार आहेत. हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतलेल्या या गगनभरारीने सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला.विवेक चौधरी यांचे वडील रामभाऊ गणपत चौधरी हे व्यवसायाने अभियंता होते. त्यांनी हैदराबाद येथे एक कंपनी सुरू केली होती, तर आई मुख्याध्यापिका होत्या. विवेक यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथे झाले.
हस्तरा येेथे त्यांची शेती व घर आहे. त्यांच्या शेतामध्ये ३०० वर्षांपूर्वी रेणुकादेवीचे मंदिर बांधलेले आहे. आजही त्यांची शेती अवधूत शिंदे हे वाहत आहेत. २०१३-१४ मध्ये विवेक चौधरी हे शेती विक्री करण्यासाठी गावात आले होते, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली.
निजामकाळात हस्तरा एक प्रसिद्ध बाजारपेठ होती. उमरखेड, कळमनुरी, बाळापूर येथील व्यवहार हे हस्तरा गावावरच अवलंबून होते. विवेक यांचे काका काशीनाथ हे हार्डवेअरचे मोठे व्यापारी होते.
विवेक चौधरी यांच्या शेती खरेदी-विक्रीच्या वेळेस मी साक्षीदार होतो. आम्हा गावकऱ्यांना या निवडीचा खूप आनंद झाला आहे. गावात त्यांच्या सत्काराचे नियोजन केले जात आहे.
– संजय चौधरी, चुलत भाऊ, हस्तरा

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….