खा. हेमंत पाटील यांच्या हस्ते दिव्यांगाना उपयुक्त साहित्याचे वाटप…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :-
सामाजिक अधिकारिता शिबिर एडिप आणि राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांग व वरिष्ठ नागरीकांना दि. ६जुलै रोजी जि.प.प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दिव्यांगणा उपयुक्त निशुल्क साहित्याचे वाटप खा.हेमंत पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले.
पंचायत समिती माहूर कार्यालयाकडून दि १७ डिसें.२०२० रोजी तालुक्यातील ४२४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती माञ मध्यकाळी कोरोना महामारीमुळे हे वाटप थांबविण्यात आले होते. माञ आज दि ६ जुलै रोजी पाच दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल खा.हेमंत पाटिल यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा यथोचित सत्कार करून उपयुक्त साहित्याचे वाटप दिव्यांग बांधवाना करण्यात आले.
यावेळी माहूर न.प.नगराधक्ष शितल जाधव,प.स.सभापती अनिता कदम, शिवसेना जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे,पं. स.उपसभापती उमेश राठोड,पं.स.सदस्य नामदेव कातले,शिवसेना तालकाप्रमुख सुदर्शन नाईक,शहर प्रमुख निळधारी जाधव,प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर,शहराध्यक्ष डॉ.बळवंत नागरगोजे,बिएसएनएल चे जनरल मॅनेजर पवनकुमार बारापत्रे
गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहान यश खराटे,संदेश केराम, खा.हेमंत पाटील यांचे जन संपर्क अधिकारी सुनील गरड,कक्ष अधिकारी बी.सी. चव्हाण,विस्तार अधिकारी तेलतुंबडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एस.एस.पाटिल यांनी केले.यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.