नांदेड व हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र ; नागरिकांनी घाबरून जावू नये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात सकाळी दोन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून या भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे.नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागात सकाळी भूकंपाचा पहिला सौम्य धक्का ८ बाजून ३३ मिनिटाला तर दुसरा ८ वाजून ४९ मिनिटाला जाणवला असल्याचे नागरिकांनी सांगितले.
ह्या भूकंपाचे मुख्य केंद्र यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत येणाऱ्या साधूनगर असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे. भूकंपाची तीव्रता ४.४ रिस्टर स्केल तीव्रता केंद्रात आहे.
जिल्हा प्रशासनाकडून भूकंपाच्या केंद्राची माहिती मिळताचसाधूनगर आणि मुडाना येथील सरपंच यांच्याशी बोलणे झाले आहे. साधुनगर आणि मुडाणा येथे भूकंपाचे धक्के जाणवले नसून कुठेही नुकसान झाले नाही.घटनास्थळी अधिकारी आणि कर्मचारी यांचा फौजफाटा पोहचला असल्याची माहिती महागाव तहसीलदार नामदेव इसलकर यांनी दिली आहे.
नागरिकांनी कृपया स्वतःची काळजी घ्यावी कृपया घरांमध्ये कोणीही थांबवू नये भूकंपाचा आवाज आल्यास नागरिकांनी घरामध्ये न थांबता बाहेर मोकळ्या जागेत थांबावे असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.