राष्ट्रीय महामार्गावर शवपेटी सापडल्याने खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार
हिवरा संगम :-
नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील हिवरा संगम येथून जवळच असलेल्या मुस्लिम कब्रस्तान जवळ रस्त्याच्या कडेला ख्रिश्चन धर्मीयांमध्ये दफन विधी करण्यासाठी वापरात येणारी ताबूत (शवपेटी) सापडल्याने खळबळ उडाली असून, सदर शवपेटी पेटीमध्ये रक्ताचे डाग सुद्धा आहे. सदर घटनेमुळे परिसरात विविध तर्कवितर्कांना पेव फुटले आहे. बघ्यांची गर्दी वाढत आहे. याच ठिकाणाच्या जवळ काल एका अज्ञात महिलेचा मृतदेह सुद्धा आढळून आला होता .

याविषयीची माहिती येथील उपसरपंच शरद पाटील यांनी महागाव पोलिस स्टेशनला कळविली असून घटनास्थळावर दाखल होऊन,महागाव पोलिसांनी शवपेटी ताब्यात घेतली असून पुढील तपास करीत आहे.


सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….