कोतवाल कर्मचाऱ्यांना शासनाचे कायदे लागू करा कोतवाल संघटनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
शासनाणे फेब्रुवारी महिन्यात परिपत्रक काढून कोतवालांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला.परंतु त्याची अंबलबजावणी करण्यात आली नसल्याने शासनाने लागू केलेल्या योजना तत्काळ लागू करण्यात याव्यात या मागणीसाठी महागाव तालुका कोतवाल संघटनेकडून विविध मागण्याचे निवेदन महागाव तहसीलदार यांना दिले आहे.
महागाव तहसील अंतर्गत सर्व कोतवाल कर्मचारी यांना अटल निवृत्ती वेतन योजना राज्य शासकीय समूह वैयक्तिक योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचा त्या त्या अटीनुसार देण्यात यावा व त्याकरिता देण्यात येणारे योजनेचे हप्ते शासनाकडून घेण्यात यावे सदर हप्ते कोतवाल कर्मचारी भरेल त्यांना त्या सदर हप्ता एवजी वाढीव रक्कम देण्यात यावी .शासनाने लागू केलेला शासन निर्णय हा १ फेब्रुवारी पासून अमलात आणण्यात आला आहे.त्यामुळे योजनेची अंबलबजावणी १ फेब्रुवारी पासून ग्राह्य धरावी व त्वरित निर्णय घेवून तात्काळ कोतवाल कर्मचारी यांना न्याय देण्यात यावा अशा आशयाचे निवेद्दन महागाव तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चव्हाण,तालुका अध्यक्ष भगवान गरडे,तालुका उपाध्यक्ष शरद वंजारे,तालुका सचिव दत्तराव हिंगडे उपस्थित होते.