कासारबेहळ परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन ; शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण ; वाघाला जेरबंद करण्याची मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
तालुक्यातील कासरबेहळ शिवारात
पट्टेदार वाघाच्या दर्शनाने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दर्शनाने शेतकरी व मजुरात दहशत पसरली आहे.
महागाव वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या कासारबेहळ परिसरात वाघ आल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासुन होती. परंतु कालदि.२२जुन(मंगळवारी)कासारबेहळ गावालगत असलेल्या सागवानाच्या शेतात अचानक पट्टेदार वाघाच्या डरकाळ्या ऐकु येवु लागल्याने अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन घडून आले.त्यामुळे शेतकरी आणि मजुरांची चांगलीच धावपळ झाली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.पेरणीच्या दिवसात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार असल्याने शेतकरी पेरणी आणि मजुरा अभावी संकटात सापडला आहे. मजूर शेतात काम करण्याची हिम्मत करत नसल्याने एन हंगामात शेती पडीत पडण्याच्या मार्गावर असुन वनविभागाने तत्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा अशी शेतकरी मागणी करीत आहेत.

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
महागाव भाजपा तालुकाध्यक्षांमुळे उमरखेड विधानसभेत होणार भाजपा उमेदवाराची पीछेहाट ?
अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….