घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची सुरुवात 28 फेब्रुवारीपासून झालेली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा सुरु असतानाच इराणवर हल्ले करण्यात आले.
अमेरिका आणि इस्त्रायलला अपेक्षित असा परिणाम युद्धानंतर दिसून आलेला नाही. इराणनं देखील अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले केले, अमेरिकेची काही विमानं पाडली. यामुळं अमेरिका आणि इराण यांच्यात सुरुवातीला काही दिवसांसाठी शस्त्रसंधी करण्यात आली. या दरम्यानच्या काळात इराण अमेरिकेच्या इच्छेप्रमाणं करार करेल आणि अणवस्त्र कार्यक्रम देखील अमेरिकेच्या इच्छेप्रमाणे थांबवेल, अशी अपेक्षा ट्रम्प यांना होता. मात्र, तसं काही होत नसल्यानं डोनाल्ड ट्रम्प संतापले असून त्यांनी इराणला आणखी एक धमकी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नव्यानं दिलेल्या धमकीमुळं आखाती देशांमधील संकट आणखी धोकादायक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे. ते म्हणाले की इराणनं शातता करारासंदर्भात तातडीनं निर्णय घ्यायला पाहिजे. ट्रम्प पुढं म्हणाले की इराणसाठी वेळ वेगानं संपतोय, त्यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे अन्यथा त्यांच्याकडे काही राहणार नाही. वेळ सर्वात महत्त्वाचा आहे, असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मीडिया रिपोर्टसनुसार या चर्चेत दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी इराणसोबतच्या पुढील युद्धाच्या धोरणावर चर्चा केली होती.
अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडून 28 फेब्रुवारीपासून इराणवर हल्ले करण्यास सुरुवात करण्यात आली. पश्चिम आशियात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणवर हल्ले सुरु केले. याचं उत्तर देण्यासाठी इराणनं आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. इराणनं कुवैत, सौदी अरेबिया, बहरीन, यूएईसह इतर देशांवर इराणनं हल्ले केले.
अमेरिकन मीडियाच्या दाव्यानुसार जर अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्यास येत्या काही दिवसांमध्ये स्थिती विस्फोटक होऊ शकते. म्हणजेच सध्या जरी युद्धावर ब्रेक लागला असला तरी स्थिती पुन्हा स्फोटक होऊ शकते किंवा भडकू शकते. इराणनं पाच अटी ठेवल्या आहेत, त्या अमेरिकेला मान्य होत नसल्यानं परिस्थिती गंभीर बनलीय.
लेबनॉनसह इतर ठिकाणी सुरु असलेली लष्करी कारवाई थांबवावी. अमेरिकनं आर्थिक आणि व्यापारी निर्बंध मागं घ्यावेत.इराणची विदेशातील गोठवलेली संपत्ती त्यांना तातडीनं मिळावी. युद्धात झालेल्या नुकसानाची अमेरिकेनं भरपाई करावी. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं सार्वभौमत्व राहील.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर ; चार दिवस “यलो अलर्ट”
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…