ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर! भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव / उमरखेड :
येथील ग्रामिण रुग्णलयाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यास अखेर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या गेल्या पंचविस वर्षापासुन सुरु असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूरी मिळाली आहे .तसेच खाटांची क्षमता सुद्धा ३० वरून १०० करण्यात आली आहे. एक महिन्यापूर्वी भुतडा यांनी उमरखेड येथे कोविड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सूतोवाच केले होते.सोबतच येथील रुग्णालयात पदे भरण्यास सुद्धा मंजूरी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
उमरखेड येथील कुटिर रूग्णालयाचे २०१३ मध्ये अवमुल्यन करून,त्याला ग्रामिण रूग्णालयात रूपांतरीत केले होते. वास्तविक पाहता १९९६ पासुन येथे उपजिल्हा रूग्णालय करावे अशी मागणी नितीन भुतडा यांनी शासनाकडे केली होती. या मागणीकडे आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्या साठी त्यांनी दोन वेळा ऊपोषण देखील केले. मागील भाजप सरकारचे काळात या मागणीला मुर्तरूप मिळाले. माजी आमदार राजेद्र नजरधने व भुतडा यांचे संयुक्तिक प्रयत्नांनी शासनाने येथील ग्रामिण रूग्णालयास उपलिल्हा रूग्णालयाचा दर्जा बहाल केला. व ईमारतीची निर्मिती सुध्दा सूरू केली. या ईमारतीचे बांधकाम ही पुर्णत्वास आले आहे. परिनामी, तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण यामुळे कुटीर रुग्णालयाची यंत्रणा पुरेशी होत नव्हती, यामुळेच उमरखेड तसेच महागाव तालुक्याची गरज लक्षात घेऊन भुतडा यांनी उपजिल्हा कार्यान्वीत करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरु केला होता. त्याकरिता शासन स्तरावर पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला होता . नुकतेच मे महिन्यात झालेल्या उमरखेड येथील एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत सूतोवाच करून सांगितले होते कि, येथील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे आणि अवघ्या एक महिन्याच्या आत याकामास मंजूरी मिळाली आहे . तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम राहावी सर्व सामान्य जनतेला आरोग्याच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात , वेळेत उपचार मिळावेत याकरिता आमदार नामदेव ससाने व नितीन भुतडा सतत प्रयत्नरत असुन, कोरोनाच्या काळात कोरोनाग्रस्तांना तात्काळक्यातील उपचार , ऑक्सिजन बेड , प्रतिबंधात्मक लस , ऑक्सिजन पुरवठा आरक्षित करून ठेवला होता . तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे, त्याठिकाणी मनुष्यबळ भरतीबाबत शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केला होता . त्याच अनुषंगाने उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी आणि मनुष्यबळ भरती करण्यास मंजूरी देण्यात आले आहे . यामुळे उमरखेड सह महागाव ,ढाणकी, व बंदिभागाला याचा लाभ होणार आहे .

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..