चोरट्यानी चक्क एटीएम मशीन पळवली ; महागाव येथील प्रकार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
येथील इंडिया नंबर – १ नामक बँकेचे खाजगी एटीएम मशीनसह त्यातील रोकड लांबाविल्याचा प्रकार महागाव येथे आज सकाळी घडकीस आला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंढे आणि महागाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक विलास चव्हाण यांनी आपल्या चमूसह दाखल होऊन निरीक्षण करून तपासकार्यास वेग दिला आहे. दरम्यान श्वान पथक आणि ठसे तज्ञास पाचारण करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. एटीएम मध्ये शिल्लक असलेल्या कॅश बॉक्स मधील रक्कम बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

पोलिसांना चॅलेंज देऊनच चोरट्यांनी एटीएम मशीन पळवली आहे का ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. तर रात्रीच्या गस्तवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान घडलेल्या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला असल्याचे पोलीस विभागातून सांगण्यात आले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….