काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या हाय हॅलो ने काँग्रेसचे जिल्हा संघटन बांधले जाणार का? ; प्रदेशाध्यक्षांच्या दौर्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीवर पडदा

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
यवतमाळ जिल्हा काँग्रेस मध्ये चालले तरी काय? जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे.या जिल्ह्यात 16 तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये 16 तालुक्यातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांचा समावेश आहे. आज पर्यंत जी काँग्रेस मोघे, पुरके, ठाकरे या नावाने ओळखली जात होती ती काँग्रेस पडद्याआड का पडत आहे? हा संशोधनाचा विषय आहे. एकंदरीतच अल्पसंख्यांक चेहरा म्हणुन एक विशिष्ट समाजातील अल्पशून्य जो आजपर्यंत नगरपालिका सोडा ग्रामपंचायत सदस्यही स्वबळावर निवडून न आलेला नेता संबोधले जातो. जो गल्ली मे नही है दिल्ली मे कहा ?अशी अवस्था असताना आजमितीस नुसते आणि नुसतेच फोटो सेशन साठी प्रदेशाध्यक्षांचे दौऱ्यात मिरवतात परंतु सांगा प्रदेश अध्यक्ष साहेब जे कोणी काँग्रेसच्या दिल्ली दिशांच्या प्रेरणेवर काँग्रेस मध्ये समाविष्ट झाले ते आज कुठे आहेत? महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत आहे परंतु यांचा जिल्हा,तालुका व गाव पातळीवर या सत्तेचा फायदा काय? तुमच्या या सतेला जणसामान्य भागीला तीन म्हणून चौकाचौकातील कट्ट्यावर बोलून दाखवतात. कोण आहेत हो?काँग्रेसचे खरे समर्थक ज्याने जिवाचे रान केले. ज्यांनी जे जे पक्ष सोडून आले आहेत आज त्यांचे कोण वाली? कालचे तुम्ही आणि निष्ठावंत कुठे आहात? तुम तो ठहरे परदेशी सारखा प्रश्न आजही जे ते त्यांच्या पक्षातुन सोडून आलेले नेत्यांना कार्यकर्ते बोलत आहे. या जिल्ह्याला स्व. वसंतराव नाईक साहेब,स्व. जवाहरलाल दर्डा साहेब,स्व. सुधाकरराव नाईक साहेब अशा बहुजन नेत्यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले परंतु आज विशिष्ट समाजातीलच काही लोकांच्या माध्यमावर जिल्हा काँग्रेसची धुरा आहे.
वडिलोपार्जितानी दिल्ली काँग्रेसची आहोहूजरी केल्यानी जरी आज जिल्हा काँग्रेसच्या सत्येत असले तरी समजून जावे हा जिल्हा बहुसंख्यकाचा आहे अल्पसंख्याकचा नाही. तुम्ही कशाची मुजोरी करता हो. तुम्ही जिल्हा काँग्रेसमध्ये अध्यक्ष म्हणून संबोधले जाता परंतु साध्या नगरपालिकेसाठी तुम्ही पक्षाला वेठीस धरता? हीच का तुमची काँग्रेसचे निष्ठावंत. अहो तुम्ही साधे ग्रामपंचायत मध्ये निवडून येऊ शकत नाही मग तुमच्या थेट आमदारकी आणि जिल्हाध्यक्षपदाला सामान्य पदाधिकाऱ्यांनी भाव द्यायचा का? असा सवाल सामान्य आणि साधे काँग्रेस कार्यकर्ते चौकाचौकात बोलून दाखवतात.
यवतमाळ, वणी,पुसद दारव्हा जिल्ह्याचे केंद्रबिंदू आहे त्या त्या ठिकाणी काँग्रेसचे संघटन पक्षबांधणी अत्यंत महत्त्वाची आहे.सांगा जिल्हाध्यक्ष साहेब तुमचे नेटिव्ह पुसद मध्ये तुम्ही कोणत्या निष्ठावंतांना तालुका अध्यक्ष केले हो? ज्याने तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या पक्षासाठी स्वतंत्र स्व-कार्यकरत्वशिल असणाऱ्या पक्षाचा राजीनामा देऊन एका डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रवेश केला. भलेही तुम्ही डॉक्टर असाल परंतु आम्हाला वाटत नाही की तुम्ही राजकारणात डॉक्टर असाल. पुसद मध्ये ज्या अजयने एका डॉक्टरांच्या विश्वासावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.दुसरे डॉक्टर आमदार झाले म्हणजे अजयला विसरले का? काँग्रेसची पुसद मध्ये तुम्ही हिंदुत्वाशी नाळ जोडता आणि ऐन वेळेवर तोंड फिरविता हीच काय तुमची काँग्रेसी नीती? सोडा हो, तुमच्या हायहॅलो ने काँग्रेस वाढणार का? तुम्ही किती तुमच्या कार्यकाळात डॉक्टर साहेब जिल्ह्यात काँग्रेसच्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता आणली. एकदा बोलून दाखवा डॉक्टर साहेब आपण केवळ आणि केवळ त्यात काँग्रेसच्या भरोशावर अनेक संस्था मिळवल्या आज त्या संस्थांमधील परिस्थिती जनसामान्य चौकाचौकात बोलून दाखवतात याचा विसर तुम्हाला पडू नये.नुसतेच कोणी आले आणि कोणी गेले मंचावर बसले व खाली उतरले याची जाण जिल्हाध्यक्षांना पाहिजे अशी जनतेत चर्चा आहे.