बिअर शाॅपी मधून बिअर बंद देशी – विदेशी दारु सुरु…. देशी दारुची मागणी वाढल्याने चढ्या भावाने विक्री सुरु….
बिअर शाॅपी मधून बिअर बंद देशी – विदेशी दारु सुरु….
देशी दारुची मागणी वाढल्याने चढ्या भावाने विक्री सुरु….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (वाई बाजार) :-
सध्या महाराष्ट्रात कोरोना आजाराचा दिवसेनदिवस पादुर्भाव वाढतच चालेला दिसत असून शासनाने लाॅकडावून घोषीत केले आहे.त्यामुळे नागरिकांना अर्थीक मंदी सोसावी लागत असल्याने बिअर व विदेशी दारु पिणारे तळीराम आता चक्क देशी दारुवर आले आहे.त्यामुळे वाई बाजार येथे देशी दारुची चांगलीच मागणी वाढली आहे.त्याचाच फायदा घेत येथील बिअर शाॅपीमधून चढ्या भावाने देशी दारू विकण्यास सुरुवात केलेली असतानाही मद्यपी आनंदाने वाढीव किंमत देवून ही दारू विकत घेत आहे. बंदी असतानाही दारुची मोठ्या प्रमाणात विक्री करुन विक्रेते मालामाल होत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे. दारूच्या दुकानांनाही उघडण्यास सध्या बंदी आहे. मात्र तालुक्यातील वाई बाजार येथे येथील बिअर शाॅपी मधून देशी व विदेशी दारु खुलेआम मिळत आहे.
माहुर -किनवट महामार्गावरील बिअर शाॅपी मध्ये खुल्या पद्धतीने ही दारू विक्री केली जात आहे. लॉकडाऊनची कठोर कारवाई पोलीस प्रशासनाकडून सुरु झाल्यामुळे विदेशी दारु विक्रीवर मर्यादा आल्या आहेत. अनेक मद्यपींना विदेशी दारुची टंचाई भासू लागली आहे. यामुळे ते देशी दारुकडे वळाले आहेत. यामुळे देशी दारुची मागणी अचानक वाढली असून याचाच गैरफायदा येथील बिअर शाॅपी विक्रेत्यांनी घेतला असून त्यांनी दुप्पट दराने देशी दारूची विक्री करण्यास सुरू केली आहे.
वाई बाजार परिसरातील काही दुर्गम भागात राहणार्या युवककाने आपली शक्कल लढवून बनावट ( डुप्लिकेट ) विदेशी दारु करायला सुरुवात केली असून ते बनावट दारु १ ते २ कि.मी अंतरावर असलेल्या बिअर बारवरुण व जुने बसस्थानकावर असलेल्या बिअर शाॅपीतून विक्री केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. सांगाल ते दारु उपलब्ध करुण मिळेल अशी सुचना हि बिअर मालकाकडून तळीरामांना दिल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला त्यातील लुप्त असलेल्या काही मंडीळीनी दिली आहे .
वाई बाजार पासून ९ ते १० कि.मी अंतरावर किनवट मार्गावर असलेल्या बिअर बारच्या दुकानात मोजून ठेवलेल्या स्टॉकची चोरी झाल्याची माहिती परिसरात पसरली असून,तशी संबधीत प्रशासनाकडे तक्रार ही झाल्याची चर्चा परिसरात होत आहे. खुद दुकानदारांनी सी.सी.टी.व्ही.चे फुटेजही डिलीट केल्याची चर्चा आहे.या सर्व बाबी लक्षात घेतल्यास सदरील मोजून ठेवलेला स्टाॅक चोरी गेला कि ? वाई बाजार येथील बिअर शाॅपी मधून विक्री केल्या जात आहे.? असा संशय परिसरातील नागरिकातून केला जात आहे.
वाई बाजार येथून बिअर शाॅपी मधून खुलेआम देशी दारू विकली जात असतांना संबधीत दारु बंदी अधिकार्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हे अधिकारी नागरिकांच्या तक्रारींना दाद देत नसल्याचे चित्र असून अवैध दारू विक्री बाबत अर्थिक हित संबंध जोपासत कारवाई करण्यास टाळाटाळ करतांना दिसत आहे.
संबधीत अधिकारी या बिअर शाॅपी बद्दल दखल घेत नसल्याने येथील काही नागरिक थेट दारू उत्पादन जिल्हा अधिक्षकांकडेही पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याची खाञी लायक माहिती आहे.अनेक वृत्तपञाच्या माध्यमातून बातम्या प्रसिध्द होऊनही अवैद्य दारू विक्री चालूच असल्याने या विक्रेत्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे ? असा सवाल विचारला जात आहे.
बाॅक्स….
देशी दारुची किंमत वाढली…
लाॅकडाऊन मुळे हाताला काम मिळत नसल्याने मद्यपींचा कल देशी दारूकडे वाढत चालल्याने देशी दारूची किंमतही वाढली आहे. सदरील बिअर शाॅपी मालक चढ्या भावाने ही दारू विक्री करीत आहे. एरव्ही ६० रुपयांना मिळणारी बाटली आता १२० ते १५० रुपयांना मिळत आहे.