कोरोनाग्रस्त गावात आवश्यक त्या सर्व उपाय योजना करा :- सचिन बेहेरे…

कोरोनाग्रस्त गावात आवश्यक त्या सर्व उपाय योजना करा :- सचिन बेहेरे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :- तालुक्यातील मालवाडा या गावात एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने जीव घेतल्याने त्या गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे गावातील नागरिकांत विश्वास निर्माण करण्यासाठी दोन दिवसाआड धुर फवारणी करणे, विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकणे,घन कच-याचे नियोजन करून गांव स्वच्छ करण्या विषयी ग्राम पंचायतला आदेश देण्याची विनंती युवक कॉँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस सचिन बेहेरे यांनी दि.22 एप्रील रोजी तहसीलदार राकेश गिड्डे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सध्या देशातील अनेक राज्यासह महाराष्ट्रातही कोरोनाने हाहाकार माजविला असून पहिल्या लाटे पेक्षा दूसरी लाट प्राणघातक व अतिभयावह आहे.त्यामुळे तालुकाभरच्या ग्राम पंचायतने आवश्यक ती खबरदारी घेवून उचित उपाय योजना करणे अगत्याचे झाले असल्याची बाब बेहेरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खा.राजीव सातव, जिल्हाधिकारी नांदेड यांना या निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत. तहसीलदारांना निवेदन देतांना त्यांचे समवेत युवक कॉंग्रेस कार्यकर्ते राजकिरण देशमुख यांचीही उपस्थिती होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….