मोहम्मद अजीम यांनी सुरू केलेल्या एक दिवसीय लक्षवेधी उपोषणाची दखल ; गायमुख नगर ग्राम पंचायत प्रशासन व शासन पाणी प्रश्न सोडविण्या साठी सरसावले…
मोहम्मद अजीम यांनी सुरू केलेल्या एक दिवसीय लक्षवेधी उपोषणाची दखल ; गायमुख नगर ग्राम पंचायत प्रशासन व शासन पाणी प्रश्न सोडविण्या साठी सरसावले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- ग्रामपंचायत गायमुख नगर प्रशासन प्रशासन मधुकर नगर परिसरात निर्माण झालेले जल संकटाचा प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ ठरल्याने या परिसरातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मधुकर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजीम हे व्यथित होऊन दिनांक 12/4/2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय गायमुख नगर समोर लोकशाही मार्गाने लक्षवेधी उपोषणाला बसले होते संबंधित मागणी ही जनहितार्थ असल्याने मोठ्या प्रमाणात गायमुख नगर प्रशासन व शासन यांच्या विरोधात नागरिकांकडून संतप्त व्यक्त करण्यात आले आहे मोहम्मद आजी यांनी हे उपोषण सकाळी 11 वाजता सुरू केले व यादरम्यान ते पत्रकार यांना आपली प्रतिक्रिया देताना म्हणाली की शासन स्तरावर ग्राम पंचायत गायमुख नगरला पाणी टंचाई दूर करण्यासाठी लाख रुपयाचा निधी प्राप्त होत असून देखील हे निधी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी खर्च होत नाही म्हणूनच मधुकर नगर परिसरातील नागरिकांना रात्र दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यामुळे आता गोरगरीब नागरिकांच्या न्यायहक्कासाठी मी स्वतः हे एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करीत आहोत सदर उपोषण सुरू असताना तीन वाजताच्या दरम्यान ग्रामपंचायत गायमुख नगर चे प्रशासन अधिकारी कांबळे यांनी मोहम्मद अजीम यांच्या उपोषणाची दखल घेऊन सन 2020-21 पाणी टंचाई निधीअंतर्गत ठराव घेऊन निधी मंजूर झाला आहे व लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून सदर परिसरात नियमीत व मुबलक पाणीपुरवठा सुरू होईल असे लेखी स्वरूपात पत्र देऊन आपल्या उपोषणाची सांगता करण्यात यावी अशी विनंती केली त्यामुळे मोहम्मद अजीम यांनी आपला उपोषण तात्पुरता स्थगित करून उपोषणाची सांगता केली आहे व या लेखी पत्रानुसार जर पाणीटंचाईची ही समस्या सोडविण्यात आली नाही तर पुढे लोकशाही मार्गाने ग्रामपंचायत गायमुख नगर प्रशासनाच्या विरोधात पंचायत समिती कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा रोखठोक इशारा मोहम्मद अजीज यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे सदर उपोषणाची सांगता करताना ग्रामपंचायत गायमुख नगर चे सरपंच संदीप जंगले व ग्रामसेवक कांबळे व ग्रामपंचायत सदस्य शालुबाई कापसे व अदी उपस्थित होते…