जिल्ह्यात सहा मृत्युसह 367 पॉझेटिव्ह ; 243 जण कोरोनामुक्त…

जिल्ह्यात सहा मृत्युसह 367 पॉझेटिव्ह ; 243 जण कोरोनामुक्त…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 15 :-
गत 24 तासात जिल्ह्यात सहा मृत्युसह 367 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 243 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 55 आणि 25 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आणि 78 वर्षीय महिला, दिग्रस तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष आणि मानोरा तालुक्यातील (जि. वाशिम) 70 वर्षीय महिला आहे. सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 367 जणांमध्ये 270 पुरुष आणि 97 महिला आहेत. यात दिग्रस येथील 126, यवतमाळातील 97, पांढरकवडा 26, महागाव 25, पुसद 24, नेर 23, वणी 14, कळंब 9, उमरखेड 6, दारव्हा 5, बाभुळगाव 4, आर्णि 2, राळेगाव 2, मारेगाव 1, झरी 1 आणि इतर ठिकाणचे 2 रुग्ण आहे.
सोमवारी एकूण 4161 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 367 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3794 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2854 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 22102 झाली आहे. 24 तासात 243 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18736 आहे. तर जिल्ह्यात एकूण 512 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 193479 नमुने पाठविले असून यापैकी 189736 प्राप्त तर 3743 अप्राप्त आहेत. तसेच 167634 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….