वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून महिला पोलीस पाटलाला मारहाण… वाई बाजार येथील घटना… पोलिस पाटलाच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सिंदखेड पोलिसात दाखल….
वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून महिला पोलीस पाटलाला मारहाण…
वाई बाजार येथील घटना…
पोलिस पाटलाच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सिंदखेड पोलिसात दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाई बाजार :-
बेकायदेशीर बिना रॉयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवून त्याला रॉयल्टी विचारली असता वाई बाजार च्या महिला पोलीस पाटलाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध शासकीय कामात अडथळा सहित विविध कलमान्वये आज (ता.१४) रोजी गुन्हा नोंद करण्यात आल्याने परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
माहूर तालुक्यात वाळूची बेकायदेशीर वाहतूक सर्वश्रुत आहे.मौजे वाई बाजार येथे आज सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान महिला पोलीस पाटील आशा बळीराम मोरे या तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची अधिकृत रॉयल्टी तपासणीसाठी पार्डी रोडवर थांबल्या होत्या दरम्यान मौजे पडसा येथील हिरव्या रंगाचा जॉन डीयर कंपनी चा ट्रॅक्टर पैनगंगा पात्रातून पडसा मार्गे वाई बाजार येथे वाळू घेऊन आले असता पोलीस पाटील मोरे यांनी वाळू वाहतूक साठी रॉयल्टी आहे का अशी विचारणा केली असता ट्रॅक्टर वरील वडसा येथील इमरान शेख व त्याचा भाऊ आणि एका अज्ञात इसमाने लोका समक्ष महिला पोलीस पाटील आशा बळीराम मोरे यांचा हात धरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की करत थापड बुक्क्यांनी मारहाण केली.या घटनेने व्यथित होऊन महिला पोलीस पाटील आशाबाई मोरे यांनी नुकतेच (ता.३) मार्च रोजी पोलीस महासंचालक यांनी निर्मिती केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील पोलिस पाटलांना कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्यासशासकीय कामात अडथळा या सदराखाली गुन्हा दाखल करण्याची तरतूद केली आहे.त्यानुसार आज घडलेल्या घटनेत बेकायदेशीर वाळू वाहतूक करून महिला पोलीस पाटलाला मारहाण करणारे शेख इमरान त्यांचा भाऊ सद्दाम व एका अज्ञात इसमावर भारतीय दंड विधानाच्या शासकीय कर्तव्य बजावत असताना शासकीय कामात अडथळा, मारहाण व वाळू चोरीचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके करत आहेत.एकंदरीत पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकामुळे पोलीस पाटलांना संरक्षण प्राप्त झाले असून आदेश निर्गमित झाल्यानंतर महाराष्ट्रातील हा बहुदा पहिलाच गुन्हा असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत गावंडे पाटील यांनी दिली.