महागाव तालुक्यात कोविड लसीकरणास सुरुवात ;तहसीलदार व टिएचओं यांनी घेतली लस
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
महागाव तालुक्यात बहुप्रतिक्षित असलेल्या कोविड लसिकरणास महागाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रात सकाळी १२ वाजता सुरवात करण्यात आली आहे. महागाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी लस घेतल्यानंतर महागाव तालुका दंडाधिकारी अर्थातच तहसिलदार नामदेव इसळकर यांना लस देण्यात आली.
दर सोमवार ,बुधवार ,शुक्रवार रोजी लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे .
प्रथमतः सर्व आरोग्य कर्मचारी ,आशा ,अंगणवाडी सेविका ,अंगणवाडी मदतनीस ,महसूल कर्मचारी ,पोलीस ,ई फ्रंट लाईन कर्मचारी व त्यानंतर ६० वर्षावरील जेष्ठ व्यक्तींना ही लस दिली जाणार आहे. वयोगट ४५ ते ६० मधील को मॉर्बिड व्यक्ती (बी.पी ,कँसर ,शुगर) असलेले आजार आहेत .अश्या व्यक्तींना आजाराचे मान्यताप्राप्त डॉक्टरांचे प्रमाणपत्र असल्यास लस दिली जाणार आहे .
तालुक्यात महागाव फुलसावंगी पोहंडूळ व काळी दौ. येथील आरोग्य केन्द्रात लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे.लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे .आधारकार्ड व मोबाईल फोन सोबत आणल्यास तात्काळ नोंदणी करून लस दिली जाणार.लस सुरक्षित असून वर नमूद वयोगटातील व्यक्तींनी लसीकरण करण्याचे आवाहन डॉ. पठाण जब्बार यांनी केले आहे .