दिग्रस तालुक्यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे जंगी स्वागत… माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड…
दिग्रस तालुक्यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे जंगी स्वागत…
माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :-
राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची महाराष्ट्र प्रदेशच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तसेच हजारोच्या समाज बांधवसह इतर चाहत्यांनी त्यांचा शिवाजी चौक येथे त्यांचे वाहन येताच काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करीत त्यांच्या गळ्यात पुष्पहार व पुष्पगुच्छ देत त्यांना तिलक लावून त्यांना पेढा भरविण्यात आला.यावेळी काँग्रेस कार्यकर्ते , समाज बांधव व त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत करीत सत्कार केला.
महाराष्ट्र राज्य मध्ये काँग्रेस पक्षामध्ये ज्येष्ठ मंत्री म्हणून अनेक वर्षापासून राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी जनतेचे उत्कृष्ट सेवा केली. या गोष्टीचा विचार करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सेवेची गरज भासत असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केल्याने काँगेसचे कार्यकर्ते , समाजबांधव व चाहत्यांवर्गासाठी अतिशय उत्साहात वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सत्कार समारंभातुन दिसत होते.
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची निवड झाल्याने काँग्रेस पक्षाची बांधणी घट्ट होणार असून शेतकऱ्यांना न्याय तसेच गरिबांना न्याय मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती. शिवाजी चौकात फटाकेबाजी व पुष्पहाराने स्वागत करतांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर जाधव,ऍड.सुधाकर जाधव, राजेंद्रसिंह चौहान,भारत देशमुख,प.स.सदस्या सुलोचना अजय कांबळे, दादाराव राठोड, कैलास चव्हाण,संतोष सातपुते, भीमराव खारोडे, देवराव देवकर,शाम ससाने,कैलास चव्हाण,मुरलीधर कांबळे,मोहम्मद नागपुरे,एन.एस.पठाण,जमीर खान,निलेश राऊत सह असंख्य कार्यकर्ते ,समाजबांधव व चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.