ओव्हरटेक जीवावर बेतले ; एक ठार तर एक जखमी महागाव तालुक्यातील घटना ;

ओव्हरटेक जीवावर बेतले ; एक ठार तर एक जखमी
महागाव तालुक्यातील घटना ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :-
मोठ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चारचाकी पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज नागपुर बोरी तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील दहिसावली ते धनोडा दरम्यान धनोडा उड्डाणपुलानजिक साडेचार वाजताच्या दरम्यान घडली.
यवतमाळ वरून महागाव कडे येणाऱ्या स्विफ्ट क्र. एम. एच.०३ए. आर२४२७या गाडीचा धनोडा उड्डाणपुलाजवळ ओव्हरटेक करतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उसळल्यानेडिव्हायडर क्रॉस करून पलीकडे अंदाजे दिडशे मीटर पलटी खात रस्त्यालगत असलेल्या शेतात जावुन पडली हा अपघात एवढा भिषण होता की यामध्ये गाडीतील अजय संजय आडे(वय३५वर्षे)रा.सेनंद ता.महागाव हा गाडीतुन रस्त्यावर खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला तर या अपघातामध्ये विरेंद्र राठोड रा.सेनंद ता.महागाव गंभीर जखमी झाला असुन त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असुन या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र कोसदनी(उमरखेड) चे वाहतुक अधिकारी उपोनि प्रेमदास आडे,अंमलदार मनोज डुबरे, मनिष तिवारी यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या सहाय्याने जखमीला उपचारासाठी हलविले . वृत्त लिहिपर्यंत मृतदेहाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी हलविण्याची प्रक्रिया चालु होती.


सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….