स्त्रीलंपट डॉक्टरला चपलीने चांगलेच सुताडले जिल्ह्यात चर्चा; डॉक्टर भुमिगत
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस
दिग्रस शहरातील एका डॉक्टरने उपचारा वेळी तरुणीशी अश्लील चाळे केले त्यानंतर तरुणीसह नातेवाईकांनी डॉक्टरला चपलीने चांगलेच सुताडले अशी चर्चा तालुक्यात ऐकायला मिळत आहे. आजाराने पीडित असलेली तरुणी नातेवाईकासोबत उपचार घेण्याकरिता दिग्रस शहराच्या मध्यवस्तीत असलेले दंत रुग्णालयात अकरा वाजता चे दरम्यान आली असता काही रुग्णाच्या तपासणीनंतर युवतीचा नंबर लागल्यानंतर डॉक्टरने आपल्या तपासणी कक्षामध्ये उपचारासाठी घेतले व दाढे वर उपचार सुरू केला.दातामध्ये बधिरतेचे इंजेक्शन देऊन मुलीसोबत डॉक्टर ने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र मुलीच्या समय सुचकतेने डॉक्टर अश्लिल चाळे करत असल्याचे लक्षात येताच मुलीने आरडाओरडा केला.व कक्ष्याबाहेर असलेल्या नातेवाईकांना आतमध्ये बोलावून सोबत घडलेला प्रकार सांगितला. व नातेवाईकां समक्ष डॉक्टरला मुलीने चपलीने चोप देने सुरू केले. तसेच मुलीच्या नातेवाईकांनी सुद्धा डॉक्टरला चोप दिला शहराच्या मध्यवस्तीत हे रुग्णालय असल्याने तसेच अनेक व्यापारी संकुलमध्ये आपले व्यवसाय प्रतिष्ठाने असून हे मारहाण प्रकरण तालुक्यात वाऱ्यासारखे पसरली . डॉक्टरला चपलीने सुताडने सुरू असताना त्यावेळी एका माजी नगरसेवकांने डॉक्टरची हुजरेगिरी करून महिलावर होत असलेल्या अन्यायाला पांघरूण घालण्याचे काम केल्याने हिन कृत्याचे दर्शन घडुन आणले.दवाख्यातुन डॉक्टर ची वरात काढणार असल्याने त्या माजी नगरसेवकाने पिडीतेला माफी मागितली.व मुलीच्या भावाने डॉक्टरच्या पत्नी फोन लावुन सांगतो असे म्हणताच सॉरी माझी चुक झाली असे करु नका मला आत्महत्या करावी लागेल असे म्हणुन कशी बशी स्त्री लंपट डॉक्टरने सुटका करून घेतली. मात्र त्या मुलीच्या भावानी दवाखाना कसा सुरु करतोस तेच बघतो असा दम भरला त्या स्त्री लंपट डॉक्टर शहरातुन मध्यं रात्रीच भुमिगत झाल्याची चर्चा आज दिवसभर होत होती. मात्र पिडीतीच्या घरचे उच्चविभूशीत असल्याने ह्या प्रकरणाची वृत्त लिहेपर्यंत दिग्रस पोलिसात कोणतेही तक्रार झाली नसल्याचे समजते. आमच्या प्रतिनिधीने डॉक्टर मारहाण प्रकरणात प्रतिक्रिया करिता संपर्क साधला असता डॉक्टर असोसिएशनच्या कार्यकारिणीचा नो रिस्पॉन्स
—————————————-
डॉक्टर असोसिएशन मात्र चिडीचूप!
ऐरवी डॉक्टरांना सोबत कोणतीही घटना घडली.जसे की मारहाण, धक्का बुक्की, अपशब्द, असे प्रकार घडले की सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन निवेदन देतात. मग उपचारा वेळी तरुणीशी अश्लील चाळे करणाऱ्या स्त्रीलंपट डॉक्टरा बदल चिडीचूप का ? तालुक्यात असा प्रश्न चर्चिला जात आहे.