जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यु ; 96 नव्याने पॉझेटिव्ह 24 तासात 44 जण बरे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि.9:- जिल्ह्यात गत 24 तासात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 96 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 44 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
मृत झालेल्या चार जणांमध्ये यवतमाळ शहरातील 74 वर्षीय व तालुक्यातील 79 वर्षीय पुरुष, तसेच दारव्हा तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 611 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9016 झाली आहे. तर आज 44 जणांना सुटी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 7808 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 288 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 79790 नमुने पाठविले असून यापैकी 78854 प्राप्त तर 936 अप्राप्त आहेत. तसेच 69838 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….