यवतमाळ जिल्ह्यात 98 जण नव्याने पॉझिटिव्ह , दोघांचा मृत्यु
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ , दि . 2 : जिल्ह्यात गत 24 तासात 98 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे . मृत झालेल्यांमध्ये महागाव तालुक्यातील 25 वर्षीय तर दारव्हा तालुक्यातील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 98 जणांमध्ये 63 पुरुष व 35 महिला आहेत . यात आर्णी तालुक्यातील एक पुरुष , बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष व एक महिला , दारव्हा शहरातील एक पुरुष , दिग्रस शहरातील चार पुरुष व दोन महिला , घाटंजी शहरातील चार पुरुष व सहा महिला , महागाव शहरातील 16 पुरुष व 13 महिला , महागाव तालुक्यातील एक पुरुष , मारेगाव शहरातील दोन पुरुष व दोन महिला , नेर शहरातील एक पुरुष व एक महिला , पांढरकवडा शहरातील एक पुरुष व दोन महिला , उमरखेड शहरातील चार पुरुष व एक महिला , वणी शहरातील तीन पुरुष , यवतमाळ शहरातील 23 पुरुष व सात महिला , यवतमाळ तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे . जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 204 अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा – यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे . सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8683 झाली आहे . जिल्ह्यात 270 मृत्युची नोंद आहे . सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 259 जण भरती आहे . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 75774 नमुने पाठविले असून यापैकी 75132 प्राप्त तर 642 अप्राप्त आहेत . तसेच 66449 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे .

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….