एस.टी दूचाकीच्या अपघातात दोन तरुण ठार एक गंभीर..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अब्दुल रहेमान चव्हाण : ९६५७१७६१४८
पुसद: उमरखेड रोडवर कोपरा फाट्याजवळ पुसद आगाराची पुसद- नांदेड या बसने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना अचानक समोर आलेल्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोघे तरुण ठार झाले असुन एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान पुसद– नांदेडकडे बसची कोपरा गावाजवळ सोयाबीन कामाच्या मजुरीसाठी ट्रीपल शीट जाणा-या खडकडरी येथील तरुणांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सुशील शिवाजी कु-हाडे (२३) हा जागीच ठार झाला. तर विक्रम पुंजाजी चव्हाण (२३) याने उपजिल्हा रुग्णालयात प्राण सोडले. रवी अशोक कु-हाडे (२७) या गंभीर जखमी वर उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली. दरम्यान सकाळी सायकलिंगला गेलेले वाहतूक शाखेचे शेख मकसूद यांना अपघाताचे वृत समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून काही नागरिकांच्या मदतीने जखमी व मृतकाना वाहनाखालून काढीत ऑटोद्वारे पुसद रुग्णालयात पाठविले. पुढील तपास पुसद शहर पोलीस करीत आहेत. सदर घटनास्थळी यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….