दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 66 जण नव्याने पॉझेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 30 :
जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 66 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 52 वर्षीय व 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 66 जणांमध्ये 48 पुरुष व 18 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 13 पुरुष व पाच महिला, यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील सात पुरुष व चार महिला, दिग्रस शहरातील दोन पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील 12 पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील पाच पुरुष, नेर शहरातील दोन पुरुष व एक महिला आणि उमरखेड शहरातील एका महिलेचा समावेश आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 276 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8536 झाली आहे. जिल्ह्यात 264 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 272 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 75242 नमुने पाठविले असून यापैकी 74334 प्राप्त तर 908 अप्राप्त आहेत. तसेच 65798 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….