उमरखेड तहसिल कार्यालयात युवकाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न ; रेती वाहतुकीत जप्त केलेले वाहन प्रकरण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
मागील १६ महिन्यापासून तहसिल कार्यालयात अवैध रेती वाहतुकीच्या कारणावरुन जप्त करण्यात आलेल्या वाहनामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आल्याने मी माझे जीवन संपवितो , अशी लेखी पूर्व सुचना देऊन शशीकांत पंढरीनाथ अमृते रा . हदगाव जि . नांदेड या २५ वर्षीय तरुणाने याने आज दि .२१ सप्टेंबर रोजी ४ : ३० थेट तहसिलदार रुपेश खंडारे यांच्या कक्षात प्रवेश करून सोबत आणलेली १ लिटर पेट्रोलची बिसलेरी बॉटल मधील पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला . तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्यास रोखल्याने अनर्थ टळला . माझ्या सोबत रेती घाटावर संबंधीत तलाठ्याने ३ गाडया पकडल्या होत्या , त्यादोघांनी प्रत्येकी दिड लाख देऊन आपल्या गाडया जाग्यावरच सोडविल्या परंतू माझ्या जवळ तलाठ्याला देण्यासाठी दिड लाख रूपये नव्हते त्यामुळेच माझी एमएच ११ एम ४७३० ही गाडी तहसिल कार्यालयात १६ महिन्यांपासून सडवित आहात , तुमच्या मुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे .मी तुमच्या समोरच जाळून घेऊन मरतो असे तहसीलदारांना ओरडून तो सांगत होता. या प्रकारामुळे तहसिल कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता .
उमरखेड तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले त्या वाहनाला सुटकेचा श्वास मिळत नसल्याने हा प्रकार त्या युवकांना केला असेल असा अंदाज काही महसूल कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे तहसील ने जप्त केलेले वाहन तात्काळ त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करून वाहने सोडून देण्यात यावी अशी मागणी सध्या रेती विक्रेत्याकडून होत आहे
सदर प्रकरणात तहसीलदार रुपेश खंडारे यांच्याकडून अधिक माहिती घेण्याकरिता त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.